एकताचा येतोय नवा कॉमेडी सिनेमा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता एकता कपूर आता बिजॉय नांबियार सोबत एक नवीन कॉमेडी सिनेमा करीत आहे. या सिनेमाचे टायटल ठरले आहे.  ‘कुकू माथुर की झंड हो गई’  या सिनेमाचे दिग्दर्शन फिल्मकार अमन सचदेव हे करणार आहेत. लवकरच या सिनेमाचे शुटही पूर्ण   होणार असल्यची  माहीती बालाजी मोशन पिक्चरच्या सूत्रांनी दिली. 

या सिनेमाबाबत अधिक माहिती देताना बालाजी मोशन पिक्चर्सचे गिरीश जौहर म्हणाले, ‘ हा सिनेमा हलक्या मूडवर आधारित असून त्यामधून सर्वांचे मनोरंजन होणार आहे. हा सिनेमा यापूर्वीच्या ‘खोसला का घोसला’  आणि  ‘ओए लक्की! लक्की! ओए’ सारखा विनोदी असणार आहे. प्रामुख्याने  या सिनेमाचा कॉमेडी हाच आत्मा आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना आवडणार असाच आहे.’

या सिनेमात माजी मिस इंडिया सिमरन कौर आणि  सिद्धार्थ गुप्ता हे दोघेजन मुख्य भूमिका करणार आहेत. सिद्धार्थ या सिनेमाच्या माध्यमातून  इंडस्ट्रीजमध्ये एन्ट्री करणार आहे.  हा सिनेमा एकंदरीत दिल्ली येथील वातावरणावर आधारित आहे. लवकरच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण  होणार आहे. या सिनेमाचे आतापर्यंत ४० टक्के शूट पूर्ण झाले आहे. अमन आणि नाम्बियार यांनी हा सिनेमा वेगळ्या स्वरुपात सादर करण्यची योजना तयार केली आहे.