टूजी स्पेक्ट्रम – अटलजींच्या चौकशीस भाजपची संमती

नवी दिल्ली दि. ९ – टूजी स्पेक्ट्रम प्रकरणात आजारी असलेल्या आणि विकलांग झालेल्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समन्स पाठविण्याबाबत भाजपने घेतलेली हरकत मागे घेण्यात आली असल्याचे समजते. भाजपचे सदस्य रवी शंकर प्रसाद यांनी गुरूवारी जेपीसी बैठकीत ही मान्यता दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

चाको कमिटी या घोटाळ्याची चौकशी करत आहे. सुरवातीला भाजपने या समितीवर बहिष्कार घातला होता मात्र आता तोही मागे घेतला गेला आहे. भाजपच्या सत्ताकाळातील अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अटलजी आणि जॉर्ज फर्नांडिस हे दोघेही साक्षीला येण्याच्या अवस्थेत नसल्याने त्यांना समन्स काढले जाऊ नये अशी मागणी समितीपुढे केली होती. मात्र उद्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाच चौकशीसाठी बोलावण्याची वेळ आल्यास कॉग्रेस सदस्यांनी अटलजींचा इश्यू करू नये यासाठी आपली मागणी मागे घेतली असल्याचे समजते.

Leave a Comment