करीना कपूर आता जरी बेगम बेबो झाली असली तरी सुद्धा ती पूर्वीप्रमाणेच काम करीत आहे. लग्नानंतर तिच्या कामात काही फरक पडेल असे वाटले होते मात्र तसे काहीच झाले नाही. सध्या ती हनीमूनला जाण्याच्या आधी सर्व काम पूर्ण करून जाण्याचा विचार करीत आहे. अजूनही नववधू असलेली बेबो ‘दबंग -२’ मध्ये एका आयटम साँगवर झळकणार आहे. ती ज्यावेळी शूटच्या सेटवर पोहचली त्यावेळी तिचे ठुमके पाहण्याची सर्वजन आतुरतने वाट पाहत होते. या आयटम साँगमध्ये ती लखनवी तडका सादर करणार असल्याचे समजते.
तसे पहिले तर बेबोचे हे आयटम साँग ‘दबंग’ च्या ‘मुन्नी…’ सारखे हिट व्हावे अशी तिची इच्छा आहे. या आयटम साँगमध्ये बेबोचा लुक सेवंटीज असा दिसणार आहे. एव्डेच नव्हे तर या गाण्यात काही लखनवी फ्लेवर पण दिसणार आहेत. बेबोने या गाण्यासाठी मनीष मल्होत्राचा डिजाइन केलेला आउटफिट घातला आहे. कपड्यांना लखनवी ऑथेंटिक टच येण्यासाठी मनीषने लखनोला जाऊन एक्सप्लोर केले आहे.
खास बाब म्हणजे या गाण्यासाठी करीनाने नोज़ रिंग घातली आहे. त्यासोबतच, ती एक मोठा शर्ट आणि लुंगी मध्येसुद्धा नजरेस पडेल. बेबोचा हा अंदाज काहीसा ‘सरकाइ लो खटिया…’ मध्ये तिची मोठी बहिण करिश्मा कपूर प्रमाणे असणार आहे. सूत्रोंने दिलेल्या महितीनुसार, या गाण्याचा सेट लखनऊच्या गल्लीमध्ये लावण्यात आला होता.