दादागिरी चालू देणार नाही- अजय देवगण

शाहरुख खान आणी यशराज सोबत सध्या टक्कर घेत असलेल्या अजय देवगनचे म्हणणे आहे की, जर त्याने आज या दादागिरीचा विरोध केला नाही तर भविष्यात याचा सर्वाना सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच मी आतापासूनच इंडस्ट्रीजमध्ये कोणाची ही दादागिरी चालू देणार नाही. ही दादागिरी मोडून काढण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहे.

याबाबत अधिक बोलताना अजय देवगण म्हणाला, ‘सध्या मी ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिज़ी आहे. त्यानंतर मी आता पुढे काय करायचे आहे याचा विचार करीत आहे, आणि जर या माझ्या कोटुंबिक संबधाचा विचार केला तर पुन्हा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. माझ्या कंपनीने जेंव्हा कमिशनच्या बाबतीत कंप्लेंट केली होती. त्यावेळी त्याला विरोध करण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. मात्र त्यावेळी मी एकच विचार केला होता की, मी जर आताच विरोध नाही केला तर भविष्यात सर्वच छोट्या बनरला ही दादागिरी सहन करावी लागणार आहे. त्यामुळे मी या दादागिरीला विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी जे काही केले आहे ते चांगले केले असे मला वाटते.’

कोर्टात जाण्याच्या माझ्या निर्णयाला घरून सुद्धा विरोध झाला. मात्र त्याचा विचार केला नाही. पुढील आठवड्यात माझा सिनेमा रिलीज होत असून त्यासाठी जरी कमी सिनेमागृह उपलब्ध झाली तरी माझी याबाबतची हिम्मत कायम आहे. मला यशजीचे दुख आहे, पण त्यासाठी मी माझ्या ७०-८० कोटीचा प्रॉजेक्ट थांबवू शकत नसल्याचेही अजयने यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment