खेळ आणि राजकरणात गल्लत नको: सुशीलकुमार शिंदे

नवी दिल्ली: खेळ आणि राजकारण याच्यात गल्लत करू नका; असे केंदीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुनावले आहे. सर्व खेळाडूंना काटेकोर सुरक्षा पुरविणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून पाकिस्तानी खेळाडूंनाही काटेकोर सुरक्षा प्रदान करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानच्या संघाबरोबर खेळले जाणारे क्रिकेट सामने उधळून लावा; असा आदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिंदे यांनी २६/११ चा दहशतवादी हल्ला आणि क्रिकेट याला एकमेकांशी जोडो नका; अशी अपेक्षा व्यक्त करतानाच भारताला पाकिस्तानबरोबर सलोख्याचे संबंध हवे आहेत; असे सांगितले.

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा भारत दौरा दि. २५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या दौर्यात ३ एक दिवसीय सामने आणि २ टी-२० सामने होणार आहेत. या दौर्याला विरोध करीत ठाकरे यांनी शिंदे यांच्या ‘भूतकाळ विसरा आणि क्रिकेट खेळ’ या विधानाचा समाचार घेतला होता.

Leave a Comment