अनुष्का शर्माने कुठलाही विश्वविक्रम केला नाही. तरीपण तिचे नाव इतीहासात नोंद होईल असे तिचे मत आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. ‘किंग ऑफ़ रोमांस’ अशी ओळख असलेले फिल्ममेकर यश चोप्रा सोबत काम केल्याने तिचे नाव इतीहासात नोंद होणार आहे. काही दिवसापुर्वीच तिने यश चोप्राच्या ‘जब तक है जान’ या सिनेमात तिने काम केले आहे. त्यासोबतच या सिनेमात शाहरुख़ खान आणि कटरीना कैफ हे सुद्धा काम करीत आहेत.
माझे नाव इतीहासात नोंद होईल- अनुष्का शर्मा
अनुष्का म्हणाली, ‘ माझ्यासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मला सुरुवातीच्या काळात यश चोप्रा यांच्या सिनेमातून काम करण्यची = संधी मिळाली. यश चोप्रा हाच एक मोठा ब्रंड आहे. त्यामुळे इतीहासात माझ्या नावची नोंद यश चोप्रा यांची हिरोइन म्हणून होईल. कुणालापण विवेक आणि चंचलता हे दोनी गुण सहजा- सहजी मिळत नाहीत त्यासठी परिश्रम घ्यवे लागतात. मात्र यश चोप्राकडे हे दोन्ही गुण होते. त्यामुळे त्यांच्या सोबत काम करताना आनंद होत होता.’
‘जब तक है जान’ च्या शूटिंगवेळी अनुष्काला यश चोप्राच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. त्यामुळेच तिला यश चोप्रा यांना समजून घेता आले. यश चोप्रा यांची सिनेमाची कारकीर्द ५० वर्षाची आहे. त्यांच्या सोबत ‘जब तक है जान ‘ या सिनेमात काम करताना त्यांच्या स्वभावाची ओळख ख-या अर्थाने झाली असेही अनुष्काने स्पष्ट केले.
