आगामी दोन महिन्यात कांदा भडकणार

पुणे /नाशिक दि. ७ – खरीपातील कांद्याची आवक महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झाली असून मंगळवारी झालेल्या पहिल्याच आवकीला सरासरीच्या तुलनेत ३६ टक्के जादा भाव शेतकर्यांचना मिळाला आहे. हा कांदा १३०१ रू.क्विटल दराने खरेदी केला गेला असतानाच उन्हाळ्यातील कांद्याला म्हणजेच जुन्या कांद्याला मात्र ९५० रूपयांचा आसपास भाव मिळाला असल्याचे समजते.

याविषयी कृषी अधिकार्यांानी दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप कांदा पीक ५० टक्केच आले आहे. वास्तविक या कांद्याची आवक बाजारपेठेत दसर्याालाच सुरू होते ती पावसाच्या अनियमिततेने हा कांदा बाजारात डिसेंबर मध्ये येईल. सध्या बाजारात असलेला कांदा साठवणीचा उन्हाळी कांदा आहे. मात्र त्याचा साठा आता संपुष्टात आला आहे. नवीन कांदा बाजारात येण्यास अवधी आहे आणि तोही मागणीच्या तुलनेत कमीच येणार असल्याचे येत्या दोन महिन्यांत कांद्यांचे भाव भडकतील असा अंदाज आहे.

उन्हाळी म्हणजे रब्बीचा कांदा सहा महिने साठवता येतो मात्र खरीप कांदा १ महिन्यापेक्षा जास्त साठविता येत नाही अन्यथा तो कुजू लागतो असे सांगून कृषी अधिकारी म्हणाले की ज्या शेतकर्यां ना साठवणीची सोय आहे ते उन्हाळी कांदा चांगला दर मिळाल्यावर विकण्यासाठी सहा महिने साठवून ठेवतात. हा कांदाच आत्ता बाजारात आहे मात्र तोही संपत आला आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन कांदाच खरेदी करावा लागेल पण मुळातच कांदा पीक कमीच आल्याने भाव वाढणार हे नक्की आहे.

Leave a Comment