रवी शास्‍त्री घेणार घटस्फोट

माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्‍त्री हे आपली पत्नी रितुपासून घटस्फोट घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. घटस्फोटासाठी त्याने काही दिवसापूर्वीच कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रवी शास्‍त्रीचे पत्नी रितुसोबतचे २२ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येणार आहेत.

रवी शास्‍त्री यांनी मे महिन्यात त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला होता. रवी आणि रितु यांना एक चार वर्षाची मुलगी आहे. घटस्फोटानंतर
शास्त्री आपले मुंबईतील वरळीतील घर सोडून चर्चगेटमधील ‘बॅचलर पॅड’मध्ये शिफ्ट होण्याची शक्यता सूत्राकडून वर्तवली जात आहे. लष्करातील एका अधिका-याची मुलगी असलेली रितु ही एक उत्तम डान्सर आहे.

काही दिवसापूर्वीच रवी शास्त्रची आई लक्ष्मी हिने मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने रविसाठी अजूनही चांगले स्थळ येत असल्याचे म्हटले होते. कितीतरी महिला त्याच्या अजूनही चाहत्या आहेत. त्यांची अजूनही पत्रे येत असलायचे ही त्यांनी सांगितले होते. त्याच्यासाठी खूप वर्षापूर्वी चांगले स्थळ आल्यानंतर त्याच्याकडे मी विचारना केली असता, रवीने त्यावेळी रीतुशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment