हाजी अली दर्गा- महिलांना प्रवेशबंदी

मुंबई दि.६ – मुंबईच्या वरळी कोस्टवरील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्यास महिलांना मनाई करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. प्रतिवर्षी देशभरातून लक्षावधी भाविक या दर्ग्याला भेट देण्यासाठी येत असतात मात्र कबरींच्या ठिकाणी महिलांना प्रवेश देणे हे इस्लामच्या शरिया विरोधात असल्याचे कारण देऊन या दर्ग्यात महिलांना प्रवेशबंदी केली गेली आहे.

१५ व्या शतकातील सूफी संत पीर हाजी अली शाह यांची येथे पवित्र कबर असून सर्व धर्माचे लोक येथे या पीराच्या दर्शनासाठी येत असतात. हाजी अली ट्रस्टचे सदस्य व प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर रिझवान मर्चंट याबाबत माहिती देताना म्हणाले की, इस्लामी विद्वानांनी या दर्ग्यात महिलांना प्रवेश दिला जाऊ नये असा फतवा काढला आहे. मात्र महिला येथे प्रार्थना करू शकतील, नमाज पढू शकतील, कबरीवर चादर किंवा फुले आत न येता, पुरूषांच्या हातून वाहू शकतील. माझी सर्व भगिनीवर्गाला त्यांनी कबरीजवळ जाऊ नये अशी विनंती आहे.

Leave a Comment