सील कमांडो टेलिव्हिजन प्रिमियरला प्रचंड प्रतिसाद

वॉशिग्टन दि. ६- अल कायदाचा म्होरक्या आणि अमेरिकेचा मानबिंदू असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवादी हल्लयात भुईसपाट करणारा क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याचा खातमा करणार्यां अमेरिकन नेव्ही सील कमांडोवर तयार करण्यात आलेल्या सील टीम सिक्स या चित्रपटाच्या टिव्ही प्रिमियरला अमेरिकेतून प्रंचड प्रतिसाद मिळाला आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरून करण्यात आलेले हे प्रसारण तब्बल २७ लाख अमेरिकनांनी पाहिले असल्याचे चॅनलने जाहीर केले आहे.

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या अगोदर दोन दिवस हे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. पाकिस्तानातील अबोटाबाद येथे लपलेल्या ओसामाला खणून काढून तेथे जाऊन सील कमांडोनी ओसामाचा खातमा केला तो मे २०११ मध्ये. २००१ सालात ओसामाने आत्मघातकी दहशतवाद्यांच्या मार्फत अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर व वॉशिग्टनवर कल्पनातीत हल्ला चढविला होता. ओसामाचा शोध आणि त्याचा खातमा दाखविणारी ही ९० मिनिटांची फिल्म केबल जगतात जागतिक साम्राज्य म्हणून ओळखल्या जाणार्याह रूपर्ट मर्डोक यांच्या व्यवसायाचाच एक भाग असलेल्या नॅशनल जिओग्राफीक चॅनलवरून प्रक्षेपित करण्यात आली.

सील टीम सिक्स – द रेड ऑन ओसामा या नावाने ही फिल्म तयार केली असून ती या वर्षाचा टॉप रेटेड शेा असल्याचेही चॅनलने जाहीर केले. चित्रपटात गृहात या आठवडाअखेर हि फिल्म दाखल होईल असे समजते. बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच हे नाट्य घडले होते. बराक ओबामा यांचा फंड रेझर म्हणून काम करणार्याी मोगूल हार्वे वेस्टीन या हॉलीवूडमधील बड्या व्यक्तीने या फिल्मसाठी पुढाकार घेतला होता.

याच विषयावरचा आणखी एक चित्रपटही तयार होत असून तो इराक युद्धावर तयार करण्यात आलेल्या ऑस्कर विजेत्या हर्ट लॉकर या दिग्दर्शकाने तयार केला आहे. झीरो डार्क थर्टी असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले आहे आणि तो जानेवारीत प्रदर्शित केला जाणार आहे असेही समजते.

Leave a Comment