वसईच्या किल्ल्यात आढळल्या ऐतिहासिक वस्तू

वसई: येथील ऐतिहासिक किल्ल्यात साफसफाई आणि खोदकाम सुरू असताना पुरातत्व बिभागाच्या कर्मचार्‍यांना काही ऐतिहासिक वस्तू आढळून आल्या आहेत.

वसईचा किल्ला केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून दरवर्षी साफसफाई आणि जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम केले जाते. त्यानुसार किल्ल्यावरील नागेश्वर मंदिरासमोर काही खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी पेशवेकालीन शैलीची प्रवेशद्वाराची कमान, बांधीव विहीर, सांडपाणी वाहून नेण्यासाठी मगरीच्या तोंडाचा आकार असलेले पाईप, माजघरातील फरशा अशा जुन्या वस्तू आढळून आल्या.

या सर्व वस्तू सुमारे ४०० वर्षापूर्वीच्या असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. या वस्तूंचा पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून अधिक अभ्यास केला जाणार असल्याचेही या विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment