रंगबदलू सरड्याला पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहतो, मात्र मादागास्कर देशातील अंबर माऊंटन पार्कात अवघ्या १ इंची लांबीच्या सरड्याची जात आढळून आली आहे. हा सरडा पाहून कोणालाही त्याच्याबद्दल कुतूहलच वाटेल, असा हा नॅनो सरडा आहे. अंगठ्याच्या नखावर बसू शकेल इतका लहान हा सरडा पूर्णपणे विकसित झालेला आहे. त्यामुळे त्याच्या जन्माच्या वेळी तो केवढासा असेल याची कल्पना येते. अतिशय दूर्मिळ आढळणारा छोटूसा सरडा पाहण्यासाठी जगभरातून प्राणिमित्र अंबर माऊंटन पार्कला भेट देत असतात मात्र काही नशिबवान प्राणिमित्रच या सरड्याला पाहू शकले आहेत..
ब्रिटिश प्राणिमित्र आणि छायाचित्रकार वील बुर्राड व लुकास यांनी नुकतीच या पार्कला भेट दिली तेव्हा जेवण करत असताना अगदी योगायोगाने या नॅनो सरड्याने त्यांना दर्शन दिले. या छोटूशा सरड्याला पाहून बुर्राड आणि लुकास प्रचंड प्रभावित झाले. त्यांच्या गाईडने दिलेल्या माहितीनुसार, हा सरडा रातकिडा, कोळी व छोट्या किटकांना खातो. स्वतःचे मोठ्या प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी रंग बदलतो. हा नॅनो सरडा फारच दूर्मिळ समजला जातो.