कृत्रिम किडनी तयार – करा थोडा इंतजार

kidney

मानवी शरीराला जे अत्यावश्यक उपयोगी अवयव आहेत त्यात हृदय, मेंदू आणि किडनीचा किंवा मूत्रपिंड यांचा समावेश होतो. वास्तविक कोणताही अवयव नसणे हे मानवाच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. मात्र या तीन अवयवांना त्यातल्या त्यात श्रेष्ठत्वाचे स्थान आहे. काही महिन्यांपूर्वीच शास्त्रज्ञांनी कृत्रिम हृदय तयार केले होते. त्यानंतर आता वैज्ञानिकांनी किडनी तयार केली आहे. जे अवयव निकामी झाल्यानंतर थेट माणूस मरणाच्या दारात पोहचतो. त्यातील दोन अवयव मानवाने तयार करून मरणावर मात केली, असेच म्हणावे लागेल. आता अर्थातच मेंदू तयार करण्याचे आव्हान आहे… पण हे आव्हान पेलले जाईल का, हा प्रश्न आहे. कारण मेंदू तयार करणे सोपे नाही. पण आतापर्यंत वैज्ञानिकांनी आव्हान पेलण्याची क्षमता बघता हे अशक्यही नाही.

संशोधकांनी तयार केलेली कॉफीच्या मगाइतक्या आकाराची ही नकली किडनी कामकाजाच्या बाबतीत खर्याा किडनीवरही मात करते. ती केवळ रक्तातून विषारी तत्त्वे बाहेर काढण्याचे कामच करत नाही तर रक्तदाबाला नियंत्रित करण्याबरोबरच डी जीवनसत्त्व तयार करण्याचे कामही करते. किडनी तयार करताना तिचा प्रत्यक्षात प्रयोग करणे अवघड होते. अखेर ब्रिटनच्या एका महिलेवर कृत्रिम किडनीची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली तेव्हा शुओ रॉय यांच्या पथकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता कुणाही रूग्णाच्या शरीरात बसविली जाईल, अशी ही किडनी सिद्ध झाली आहे. कृत्रिम किडनीचे दोन भाग असून, एकात सिलिकॉनचे अत्यंत बारीक फिल्टर आहेत. जे रक्ताच्या दाबात साखर, मीठ, पाणी आणि दुसर्या् तत्त्वांना गाळून घेते. किडनीच्या दुसर्या  चेंबरमध्ये मानवी किडनीच्या रक्तपेशींचा जो थर असतो. त्यातून पुढे निघून साखर, मीठ, पाणी पुन्हा रक्तात मिसळतात. येथेच डी जीवनसत्त्वही बनते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी रक्ताचा योग्य प्रवाह आवश्यक असतो. खरी किडनीही असेच काम करते. मात्र किडनी फेल झाल्यानंतर ज्या डायलिसीसने काम धकवून घेतले जाते. ते अशा प्रकारचे काम करू शकत नाही. डायलिसीसच्या प्रक्रियेत वेळ जास्त लागतो. यात रूग्ण कमजोर होतो. त्यामुळे रूग्ण डायलिसीसचा पर्याय पसंत करत नाहीत. मात्र अनेकदा पर्यायच नसल्याने त्यांना डायलिसीसवर जाण्याशिवाय मार्ग नसतो.

देशात १७५ ते २०० मिलियन रूग्ण
भारतात १७ व्यक्तीमागे एकाला किडनी विकार झालेला आहे. किडनी विकारांचे प्रमाण १० टक्के आहे. शहरात दर आठवड्यास एका रूग्णाला किडनीचा विकार झालेला आढळतो. या विकाराची तीव्रता लक्षात घेता यासंदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे. या व्याधीच्या रूग्णांची नेमकी संख्या किती याबाबत शासनातर्फे राज्यातील कोणत्याही ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे किडनी रूग्णांची राज्यातील संख्या कुणालाही माहीत नाही. मागे मुंबईतील नॅफ्रोलॉजी या संस्थेने किडनी रूग्णांचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार दरवर्षी तीन ते चार लाख नागरिकांना किडनीचे विकार जडत असल्याचे समोर आले होते. किडनी विकाराचे देशात १७५ ते २०० मिलियन रूग्ण आहेत.

कृत्रिम किडनी मिळणार १५ वर्षांनी

कॅलिफोर्निया विद्यापीठातील भारतीय वंशाचे संशोधक शुभो रॉय यांनी तयार केलेली जगातील पहिली कृत्रिम किडनी भारतातील लाखो किडनी पेशंटसाठी आशेचा किरण ठरणार असल्याचे मत वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र ट्रायलमध्ये हे संशोधन किती यश मिळविते, ते महत्त्वाचे असून, त्यात यशस्वी ठरल्यासही ही किडनी वापरात येण्यासाठी किमान पंधरा वर्षे जातील, असा अंदाज वर्तविला आहे. रॉय यांनी तयार केलेल्या किडनीचा प्रयोग अजूनही प्राथमिक अवस्थेत असून, कृत्रिम किडनीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. या गुठळ्या होऊ न देण्यासाठी थिमर्स वापरल्यास ब्लिडिंग होऊ शकते. त्यामुळे मानवासाठी ती किती उपयुक्त आहे, ते ठरण्यासाठी अनेक प्रयोग करावे लागतील.

सध्या स्टेम्स सेल्सच्या मदतीने किडनी पुन्हा कार्यरत करण्यासाठी प्रयोग सुरू आहेत. प्राण्यांची जेनेटिक यंत्रणा मानवासारखी करून मग त्यांची किडनी वापरता येईल, असे काही संशोधकांना वाटते. या प्रयोगांची यशस्वीता नजिकच्या वर्षांमध्ये दिसत नसली तरी भविष्यात यावर उपाय नक्की सापडेल, असे किडनीतज्ज्ञ आणि नर्मदा किडनी फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. भरत शहा यांनी सांगितले. आतापर्यंत किडनीवर फारसे संशोधन झाले नव्हते. त्यामुळे हे संशोधन लाखो पेशंटसाठी अतिशय आशादायी आहे. मात्र तीन ट्रायल्समधून जाण्यासाठी त्याला १५ वर्षे लागतील. प्राण्यांमध्ये ते यशस्वी झाले असले तरी मानवातील प्रयोगांवरच त्याचे खरे यश अवलंबून आहे. बरेचसे संशोधन या पातळीवर मागे राहते. मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यास किडनीरोपण आणि डायलिसीससारख्या खर्चिक उपायांना बाजूला करता येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment