पाक गृहमंत्रालयाची ‘नजरचूक’

इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तान या देशांच्या निर्मितीपासून ‘काश्मीर’ हा या दोन देशांमधील धुमसता विषय राहिला आहे. मात्र आधी पाक गृहमंत्रालयाने काश्मीर हे भारतातील एक राज्य असल्याचे मान्य केले आणि त्याबद्दल मोठा गदारोळ होताच ‘नजरचूक’ हे कारण पुढे करून कोलांटीउडी मारली.

काश्मीर हे भारताचे राज्य असल्याचे पाक गृहमंत्रालयाने त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेल्या एका दस्तावेजात नमूद केले. मात्र याबाबत माहिती पुढे येताच देशभर मोठा गदारोळ माजला आणि पाक गृहमंत्रालयावर आगपाखड सुरू झाली. मग पळतभुई थोडी झालेल्या गृहमंत्रालयाने संबंधित कागदपत्रात ‘वादग्रस्त’ असा करायचे नजरचुकीने राहून गेले अशी केविलवाणी सारवासारव केली आहे.