तालीबानांचा बिमोड करा- पाक सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

इस्लामाबाद: तालिबानांची पाकिस्तानातील वाढती घुसखोरी आणि कारवाया रोखण्यासाठी पाक सुरक्षा यंत्रणांनी कठोर पावले उचलावीत; असे आदेश पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

शुक्रवारी कराची येथे तालिबान दहशतवाद्यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याशिवाय मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट या संघटनेने पाकिस्तानातील तालिबानांच्या कारवायांबाबत चिंता व्यक्त करताच तालिबान प्रवक्ता एहसानुल्लाह एहसान याने मूव्हामेंटच्या बालेकिल्ल्यात घुसून धडा शिकविण्याची धमकीही दिली आहे.

या पार्श्वभूमीवर कराची शहर आणि प्रांतातील ढासळती कायदा सुव्यवस्था स्थिती यावर दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने तालीबानांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. कराची प्रांतात सुमारे ७ हजार तालीबानांनी शिरकाव केल्याचे पोलीस प्रमुखांनी देखील मान्य केले. तालीबानांशिवाय इतर सशस्त्र गटांवर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Comment