बॉलीवुडचा किंग शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. त्या निम्मित शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या प्रशसंकानी मोठी गर्दी केली आहे. गुरुवारी रात्रीपासून त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्यावर त्याच्या प्रशंसकाची रीघ लागली आहे.

यावेळी शाहरुखने आपल्या चाहत्याकडून शुभकामना स्वीकारल्या. शाहरुखच्या वाढदिवसानिम्मित बॉलीवुडमधील काही त्याचे सहकारी देखील ‘मन्नत’ बंगल्यावर पुष्पगुच्छ घेऊन हजर झाले होते. त्यामध्ये प्रसिद्ध डायरेक्टर करन जौहर, फराह खान, अभिनेत्री मलाइका अरोरा-खान यांचा समावेश आहे.
काही दिवसापुर्वीच डायरेक्टर यश चोप्रा यांचे निधन झाले आहे. त्यामुळे शाहरुखने वाढदिवस सध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच त्याने नेहमीप्रमाणे मोठ्या पार्टीचे आयोजन केले नाही. यश चोप्राच्या ‘ जब तक है जान’ शेवटच्या सिनेमात शाहरुख, कटरीना आणि अनुष्का लीड रोल करीत आहेत. हा सिनेमा दिवाळीत रिलीज होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.