भारतीय टीम कमजोर नाही- धोनी

काही दिवसापूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार सुनील गावस्करने राहुल द्रविड आणि लक्षमनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्याने टीम इंडिया कमजोर झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. ते मत फेटाळत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तो टीम इंडियाच्या कामगिरीने संतुष्ट असलायचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्च्या मालीकेत भारतीय सघाची कामगिरी चांगली असेल असे त्याने स्पष्ट केले.

यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना कर्णधार धोनी म्हणाला, ‘ केवळ कागदावर टीम इंडिया जरी कमजोर दिसत असली तरी तरुण खेळाडू अधिक असल्याने टीममध्ये आत्मविश्वास आहे. येणा-या काळात वेळेनुसार चांगली कामगिरी कशी करावयाची याची सर्वाना कल्पना आहे. त्यामुळे आगामी काळात सांघिक कामगिरीत निश्चितच सर्वाना बदल दिसून येईल. आम्ही घरच्या मैदानावर खेळणार असल्याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत आमचे पारडे जड आहे. ‘

भारत व इंग्लंड यांच्यातील चार सामन्याच्या कसोटी मालिकेला १५ नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार असून गेल्या वर्षी इंग्लंड दौ-यावर गेल्यानंतर भारतीय संघाला मानहानीकारक असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे येत्या काळात हा पराभवाचा वचपा काढण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे टीम इंडियाची कामगिरी कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment