’सँडी’ वादळात अडकले भारतीय मुलाचे पथक

नवी दिल्ली,३१ ऑक्टोबर-दिल्ली व शिमलाहून गेलेले मुलाचे एक पथकही अमेरिकेचे चक्रीवादळ ’सँडी’मुळे तेथे अडकले आहे. ३१ मुलांचे हे पथक दहा दिवसाचे शैक्षणिक सहलवर नासाला गेले होते परंतु सध्या न्यूजर्सीमध्ये अडकले आहे. न्यूजर्सी, न्यूयॉर्क, मेरीलँड, पेंसिल्वानिया व कनेक्टिकटसहित अमेरिकेचे १२ राज्य वादळाच्या सापळ्यात आले आहेत. वादळामुळे मूसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पुरासारखी स्थिती आहे, विज गुल आहे आणि जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. मुलांच्या या पथकाचे संचालक रोहित शेखर शर्माने सांगितले की, सर्व मुले व पथकाचे इतर लोक सुखरूप आहेत.

यात शंका नाही की, मुले घाबरलेले व भिलेले आहेत. परंतु आम्ही पूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे. कारण येथे पूर्वीच चेतावनी देण्यात आली होती यामुळे आम्ही पूर्वीच पाणी व खाण्याची सामग्री खरेदी करून ठेवली. या व्यतिरित्त* आम्ही मेणबत्ती देखील जमा करून ठेवली आहे. हे मुले दिल्लीचे अहल्कॉन पब्लिक स्कूल व शिमलाचे ऑकलँड पब्लिक स्कूलचे आहेत आणि यात पाचवीपासून दहावीचे विद्यार्थी आहेत.

सहलीचा हा अंतिम टप्पा होता आणि उद्या हे पथक परत येणार होते. रोहितने म्हटले, आम्ही सोमवारी खुप खरेदी केली कारण आम्ही परत येण्याची तयारी करत होतो. परंतु सध्या सर्व उड्डाण स्थगित करण्यात आलेले आहे आणि सध्या काही सांगणे खुप कठीण आहे की, आम्ही केव्हा परत येऊ शकतो. मुलांना आपल्या पालकांची आठवण येत आहे परंतु आम्ही लोक चेष्टा-मस्ती करून नाचून, गाऊन स्वतःला आनंदी व व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असून आपला वेळ घालवत आहोत. रोहितने सांगितले की, आम्ही न्यूजर्सीच्या एक हॉटेलमध्ये थांबललो आहोत.