नीलम चक्रीवादळ भारतीय किनार्‍याला दाखल

तिरूअनंतपुरम: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले नीलम चक्रीवादळ बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चेन्नईला वळसा घालून महाबलिपुरम या ठिकाणी जमिनीवर आले. या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर जीवन वा वित्तहानी झालेली नाही.

संध्याकाळपर्यंत तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात धडकले. या काळात वार्याचा वेग ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे बहात होते. चेन्नई, पॉडिचेरी, महबलिपुरम या ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यसह पाऊस कोसळला. मात्र झाडे पडण्याच्या काही घटना आणि दोन झोपड्यांची पडझड वगळता; या वादळाने मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आंध्र प्रदेशच्या किनार्‍यावरून १ आठवड्यापूर्वी समुद्रात गेलेले सुमारे १३० मच्छिमार अद्याप समुद्रात असून तटरक्षक दल त्यांचा शोध घेत आहेत.

Leave a Comment