जेव्हा गावस्कर-कपिल पैशासाठी भांडले…

नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर-भारताने आपल्या मायभूमीत इंग्लडविरूद्ध अखेरची मालिका १९८४-८५ मध्ये गमावली होती. त्या सामन्याच्या आधीच सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यात पैशावरून भांडण झाले होते.

कपिलला कोलकातामध्ये खेळलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. या दोघांत समझोता करण्यासाठी अखेर तत्कालीन बोर्ड अध्यक्ष एनकेपी साळवे यांना हस्तक्षेप करावा लागला होता. या वादाची ठिकणी वाराणसीमध्ये १६-१७ नोव्हेंबर १९८४ रोजी खेळण्यात आलेल्या सिंगल विकेट टूर्नामेंटदरम्यान पडली होती. या सामन्याचा सूत्रधार आणि वरिष्ठ क्रीडा पत्रकार पदमपति शर्मा यांच्या मते, गावस्कर आणि कपिल यांच्यात सामन्याच्या मानधनावरून भांडण झाले होते. त्याचा परिणाम इंग्लडविरूद्धच्या मालिकेवर जाणवला.

शर्मा म्हणाले, या सामन्यात कर्णधार गावस्करला सर्वाधिक दहा हजार रुपये, त्यानंतर कपिलला सात हजार रुपये रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सामन्यात मोहिंदर अमरनाथ, दिलीप वेंगसरकर, रवि शास्त्री, संदीप पाटिल, मदनलाल, चेतन चौहान आणि यशपाल शर्मा हेदेखील होते. तेव्हा बनारस क्रिकेट संघाचे अध्यक्ष राजीव रंजन यादव यांनी जिम्मी (मोहिंदर) यांना लायन्स क्लबमधील पाटीदरम्यान म्हटले होते की, गावस्करला ४० हजार रुपये मिळाले आहेत. कपिलला हे माहिती पडले तेव्हा तो खवळला. दोघांत तीव्र मतभेद झाले.

Leave a Comment