नवी दिल्ली: मंत्रिमंडळाला तरुण, कार्यक्षम आणि स्वच्छ चेहेरा प्रदान करण्यासाठी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि खातेबदलानंतर पुन्हा मंत्रिमंडळात काही खांदेपालट करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: मंत्रिमंडळाला तरुण, कार्यक्षम आणि स्वच्छ चेहेरा प्रदान करण्यासाठी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि खातेबदलानंतर पुन्हा मंत्रिमंडळात काही खांदेपालट करण्यात आला आहे.
लालचंद कटारिया यांना देण्यात आलेले संरक्षण राज्यमंत्रीपद बदलून त्यांना ग्रामविकास राज्यमंत्री करण्यात आले आहे. मिलिंद देवरा यांच्याकडे दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान या खात्यासह जलवाहतूक विभागाच्या राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. पानाबाका लक्ष्मी यांना वस्त्रोद्योग ऐवजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे राज्यमंत्री पद देण्यात आले.
या बदलांवर राष्ट्रपती कार्यालयातून शिक्का मोर्तब करण्यात आले.