सँडी आणि नीलम नंतर टॉमी आणि महासेनचा नंबर

storm

अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क व अन्य भागात तबाही माजविणार्या  प्रलयंकारी चक्रीवादळाला सँडी हे गोड नाव का दिले गेले असेल अशी शंका कुणाच्याही मनात येणे सहज शक्य आहे. ही शंका दूर करण्यासाठी ट्रोपिकल वादळांबाबत थोडी माहिती घेणे गरजेचे आहे. ट्रोपिकल वादळांना अशी नांवे मुद्दाम दिली जातात आणि त्याचा मुख्य उद्देश हवामान विभाग, वेधशाळेतील अधिकारी आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि सोपा व्हावा असा असतो. ही नांवे वादळांच्या सायंटिफिक नावापेक्षा लक्षात ठेवायला सोपी असतातच पण त्यातून वादळाची तीव्रता आणि दिशा समजू शकेल असाही प्रयत्न केला गेलेला असतो. एकाच वर्षात एकाच भागात किंवा अनेक भागात वादळे येणार असतील तर वादळांचे अशा प्रकारे बारसे केले असेल तर ते अधिक उपयुक्त ठरते.

विशेष म्हणजे अशी नांव महाभयंकर चक्रीवादळांना दिली जात नाहीत. याचे कारण म्हणजे वादळी वारे ३९ मैल वेगाने वाहणार असतील तर त्याला नाव दिले जाते व हेच वारे ७४ मैल प्रतितास वेगाने वाहू लागले तर तेच नाव या चक्रीवादळाला कायम केले जाते.

हवामान अंदाज देणार्याि एका ऑस्ट्रेलियन तज्ञाने ही प्रथा सुरू केल्याचे इतिहास सांगतो. देशावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीला नावडत्या राजकीय नेत्यांची नांवे देण्याचा प्रघात त्याने पाडला. त्यानंतर दुसर्यात जागतिक महायुद्दात घरापासून दूर राहिलेल्या यूएस आर्मी आणि नेव्हीच्या सैनिकांनी होमसिकनेस कमी करण्यासाठी आपल्या प्रेयसी अथवा बायकांची नांवे अशा आपत्तींना देण्याची सुरवात केली. नंतर १९५३ मध्ये हवामान विभागाने अशा बायकांची नांवे दिल्या गेलेल्या आपत्तींची यादीच अधिकृत रित्या जाहीर केली. १९७९ पासून यात पुरूषांच्या नावाचीही भर पडत गेली आणि २००० सालापासून अशा सायक्लोनची जी यादी जाहीर झाली त्यात अनेक आशियाई नांवे आहेत तशीच प्राणी, पक्षी, झाडे आणि फुलांचीही नांवे आहेत.

विशेष म्हणजे जगभरातील वेधशाळा या नांवांच्या यादीत भर घालू शकतात.अशी यादी वर्ल्ड मेटेरिऑलॉजी ऑरगनायझेशन कडे पाठविली जातात व ही संस्था या नावांना अंतिम मंजुरी देते. ज्या देशांना सतत वादळांचे तडाखे बसतात त्या देशांशी संबंधित अशी ही नांवे असतात. सायक्लोन नर्गिस, हुरिकेन कतरिना ही अशीच कांही नांवे. या वादळांनीही मोठे नुकसान केले असल्याने आता पुन्हा ही नांवे कधीच दुसर्यान वादळाला दिली जाणार नाहीत असेही सांगण्यात येते. सायक्लोनसाठी नांवे कमी पडत असतील तर ग्रीक मुळाक्षरांची अल्फा, बीटा, गॅमा अशी नांवे दिली जातात

उत्तर गोलार्धात धडकलेल्या सँडी नंतर येणारे वादळ हे टॉमी म्हणून ओळखले जाणार आहे तर भारतात धडकलेल्या नीलम नंतर येणारे चक्रीवादळ हे महासेन या नांवाने ओळखले जाणार आहे.

Leave a Comment