स्टीव्ह जॉब्जची व्हेनिस जलावतरणाच्या तयारीत

अॅपलचा दूरदर्शी सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज याच्या स्वप्नातील अंतिम मास्टरपीस आयफोन किवा आयपॅड असावा अशी जर तुमची कल्पना असेल तर ती पूर्ण चुकीची आहे. कारण प्रत्यक्षात त्याला आयुष्यातील अंतिम मास्टरपीस बनवायचे होते २६० फुटी याच किवा जहाज. आक्टोबरमध्ये त्याचा मृत्यू होण्यापूर्वी या याचचे डिझाईनही तयार करण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष या जहाजातून सफर करण्यापूर्वीच तो न परतीच्या प्रवासाला निघून गेला.

डच जहाज बांधणी उद्योजकांने स्टीव्हच्या या ड*ीम व्हेसलला अंतिम स्वरूप दिले असून हे व्हिनस- प्रणय आणि सौंदर्याची देवता असे नामकरण करण्यात आलेले हे आकर्षक जहाज जॉबच्या मृत्यूनंतर १ वर्षाने जलावतरणासाठी सिद्ध झाले आहे. या जहाजाला १० फुटी उंच अशी विशिष्ट काचेपासून बनविलेली खिडकी असून अॅल्युमिनियमचा वापर केल्याने हे जहाज वजनाला हलके आहे. जहाजावर सात २७ इंची आयमॅक संगणकही बसविण्यात आले आहेत.

स्टीव्हच्या आत्मचरित्राचे लिखाण करणार्या. लेखकाशी स्टीव्ह या जहाजासंबंधी बोलला होता आणि कदाचित हे जहाज मी पाहू शकणार नाही असे सांगतानाच तरीही हे माझे स्वप्न मला पूर्ण करावे लागेल, कदाचित ते मी लॉरेन्ससाठी सोडून जाईन असेही तो म्हणाला होता. जॉब्जचे कुटुंबिय अल्समीर, नेदरलँड येथे होणार्या  व्हीनसच्या जलावतरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या जहाज बांधणीत सहभागी झालेल्या प्रत्येकाल त्यांच्याकडून आयपॉड शफल एम पी थ्री भेट म्हणून दिले जाणार असल्याचेही समजते.