जेम्स बाँड – डॉल्फिन

वॉशिंग्टन – आपल्या मैत्रीपूर्ण स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला डॉल्फिन चांगला जासूसदेखील असतो. नजर ठेवण्यात तर तो सुपर जासूस जेम्स बाँडलाही मात देऊ शकतो. अलीकडेच करण्यात आलेल्या एका अध्ययनात असे आढळले की, झोपतानाही डॉल्फिन अर्धजागृत असतो. झोपेत त्याच्या मेंदूचा अर्धा भाग निद्रीस्त असतो, मात्र अर्धा भाग सक्रीय राहतो. विशेष म्हणजे अलर्ट अवस्थेत डॉल्फिन सलग १५ दिवस राहू शकतो. 

नॅशनल मरीन मॅमल फाउंडेशनचे ब्रायन ब्रांसटेटर यांच्या मते, डॉल्फिन १५ दिवस या अर्धचेतनेत राहू शकतो. तसेच याकाळात तो आपल्या आसपासचे वातावरण, आपले लक्ष्य आणि वातावरणाची देखरेखही करू शकतो. संशोधकांनी त्यासाठी दोन डॉल्फिनचे अध्ययन केले. यात एक नर तर दुसरी मादा होती. संशोधकांना असे आढळले की, दोन्ही पाच दिवसापर्यंत न थकता असे करू शकतात. मादा डॉल्फिन १५ दिवस या अवस्थेत राहिली. अर्थात, या अवस्थेत राहण्याची तिची कमाल मर्यादा आकलन झाली नाही. झोपेत अर्धजागृतीत सक्रिय राहिल्याने डॉल्फिन झोपेतही श्वास घेण्यास सक्षम असतो. या नवीन संशोधनामुळे डॉल्फिनच्या अनेक पैलूंवर प्रकाश पडला आहे.

 

Leave a Comment