भारतात २ नोव्हेंबरला लाँच होणार आयफोन ५

जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असलेला अॅपलचा नवा फ्लॅगशीप आयफोन पाच भारतात दोन नोव्हेंबर पासून मिळू शकणार असल्याचे कंपनीचे भागीदार इनग्रॅम मायक्रो यांनी जाहीर केले आहे. मात्र भारतात त्याची किंमत किती असेल याचा कोणताही खुलासा त्यांनी केलेला नाही.

यूएस बाजारात आयफोन पाच, १६, ३२, ६४ जीबी व्हर्जनमध्ये उपलब्ध असून त्याच्या किमती अनुक्रमे ६४९, ७४९ आणि ८४९ डॉलर्स अशा आहेत. सध्याच्या विनिमयाचा दर लक्षात घेतला तर भारतात याच किमती अनुक्रमे ३४८३० ,४०,१९५ ,व ४५५६० रूपये होतात. अर्थात या किमती आयात कर व स्थानिक कर वगळून आहेत. जाणकारांच्या मते या किमती १६ जीबीसाठी ४५५००, ३२ जीबीसाठी ५२५०० तर ६४ जीबीसाठी ५९५०० रूपये अशा असतील. या किमती आयफोन चारशी मिळत्याजुळत्या आहेत.

अर्थात अॅपलकडून याबाबत अद्यापी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.