व्यवसाय गुंतवणुकीसाठी इमर्जिंग शहरे

नवी दिल्ली दि.२६ – भुवनेश्वर, चंदीगड, कोईमतूर, जयपूर, कोची, इंदोर,बडोदा, विशाखापट्टणम,अहमदाबाद ,नागपूर ही दीर्घकालीन व्यवसाय गुंतवणुकीसाठीची भारतातील दहा इमर्जिंग शहरे असल्याचे कशमन आणि वेकफिल्डने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. हे सर्वेक्षण करताना एकूणातच अधिक फायदेशीर ठरू शकणार्याण शहरांचे स्थान, लोकसंख्या, सामाजिक व्यवस्था, रियल इस्टेट सुविधा, सध्याची आर्थिक उलाढाल, भविष्यात आर्थिक उलाढालीच्या संधी व संबंधित राज्य सरकारांचा असलेला पाठिंबा व उद्योगांसाठी राबविण्यात येत असलेली धोरणे विचारात घेतली गेली आहेत.

अर्थात सर्वाधिक योग्य अशा या शहरांचे स्वतंत्र कांही ना कांही वैशिष्ट्य आहे. उत्पादन प्रकल्पांसाठी स्वस्त जमीन, कच्च्या मालाची उपलब्धता, वाहतूक ही महत्त्वाची अंगे असतात तसेच कुशल आणि मुबलक मनुष्यबळही महत्त्वाचे असते. या शहरांचे भौगोलिक स्थान, लोकसंख्या, पायाभूत सुविधा कांही विशेष उद्येागांसाठी अधिक अनुकुल आहेत असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

उदाहरणार्थ विशाखापट्टणम खनिज व जड उद्येागांसाठी अधिक फायदेशीर आहे तर कोची आय टी व टीइएस व व्यापार क्षेत्रासाठी योग्य आहे. जयपूर सेवा उद्योगातील गुंतवणूकीसाठी फायदेशीर ठरणार आहे तर कोईमतूर वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, फौंड्री, पंप व वाहन सुटे भाग उत्पादन गुंतवणुकीसाठी चांगले आहे. अहमदाबाद वाहन उद्योग व अन्य उत्पादन गुंतवणुकीसाठी सुटेबल आहे तर इंदोरही वाहन व औषध उत्पादन उद्योगांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या शहरांना त्यांच्या राज्य सरकारांचा भक्कम पाठिंबा असून ही शहरे उद्योगकेंदे व्हावीत या दृष्टीनेच सरकार धोरणे ठरवित आहे.

ही सरकारे गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी कॅम्पेन राबवित आहेत व त्याचे उत्तम उदाहरण म्हणून गुजराथ सरकारचा उल्लेख ही करण्यात आला आहे. गुजराथेत भरविल्या गेलेल्या इंडस्ट्री समिट असे उद्योग आकर्षित करून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत. शिवाय उद्योगांसाठी लागणार्याे सरकारी परवानग्या त्वरीत देणे, करसवलती असेही मार्ग सरकार अवलंबित असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment