स्टुडंट ऑफ द इयर

या चित्रपटाला ’स्टुडंट ऑफ द इयर’ म्हणावा की यावर्षाची डोकेदुखी हे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून हा सिनेमा पाहता यावर अवलंबून आहे. दिग्दर्शकाने तरुणाई डोळ्यासमोर ठेऊन हा सिनेमा तयार केला आहे. दिग्दर्शकाने चित्रपटसृष्टीत आघाडीच्या कलाकारांना चित्रपटात घेण्याऐवजी नवोदितांना  संधी दिली आहे.

या चित्रपटाची प्रेरणा अब्बास टायरवालाच्या ’जाने तू या जाने ना’ या चित्रपटावरुन घेतल्याचे आपल्या लक्षात येईल. ’जाने तू या जाने ना’ या चित्रपटाततरुण-तरुणींचा एक ग्रुप एकत्र येऊन आपल्या कॉलेज लाईफमधील दिवसांची आठवण काढताना दिसतात. काहीसे असेच या चित्रपटातदेखील पाहायला मिळते. या चित्रपटातील कलाकार दहा वर्षे मागे जाऊन आपल्या शालेय जीवनात डोकावताना दिसतात. 

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दोन मुले आणि एक मुलगी दिसते. त्यांच्यातला रोमान्स आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतो. शीर्षकावरुनच चित्रपटात कलाकारांमध्ये ’स्टुडंट ऑफ द इयर’चा खिताब पटकावण्यासाठी चाललेली चढाओढ पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच डान्सिंग, सायकलिंग, स्विमिंग, रनिंग अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये स्टुडंटसमधली चढाओढ पाहायला मिळते. चित्रपटात विजेत्याला अमेरिकन युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळते. ’रट्टा मार’ या गाण्यातही आपण ’स्टुडंट ऑफ द इयर’चा खिताब मिळवण्यासाठी स्टुडंटस कशी तयारी करतात हे स्क्रिनवर पाहायला मिळते.

वरुण धवनने (दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा स्क्रिनवर बराच कम्फर्टेबल दिसला) शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाची भूमिका साकारली आहे. आलिया भट्ट शाळेत जाणारी मुलगी आहे. (आलिया महेश भट्ट यांची मुलगी आहे.)

शाळेचे डीन (ऋषी कपूर) यांना चित्रपटात समलैंगिक दाखवण्यात आले आहे. या शाळेत एक उत्तर भारतीय मुलगा (सिद्धार्थ मल्होत्रा) दाखल होतो. त्याची शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाबरोबर घनिष्ट मैत्री होते. या दोघांचेही शाळेतील एकाच मुलीवर प्रेम जडते. येथे टिपिकल बॉलिवूड रोमान्स पाहायला मिळतो. अशा धाटणीचे चित्रपट तयार करण्यात करण जोहरचा हातखंडा असल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.
या मुलीचे उत्तर भारतीय मुलावर प्रेम आहे. येथे चित्रपट टीपिकल लव्ह ड्रामाकडे वळतो.

तुम्हाला ’कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील करीना कपूरची एन्ट्री आठवतच असेल. अशा प्रकारची एन्ट्री प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरते. त्यामुळे अशा दृश्यांचा वापर याही सिनेमात करण्यात आला आहे.
असो, ’स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाला मी माझ्या जनरेशनचा ’जो जीता वही सिंकदर’ (१९९२) हा सिनेमा म्हणेल. हं पण या चित्रपटात बर्‍याच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात.

 

Leave a Comment