’विंडोज ८’ लवकरच बाजारात

नवी दिल्ली,२५ ऑक्टोबर-मायक्रोसॉफ्ट कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिमची विंडोज आठ ही लवकरच बाजारात येणार आहे. यापूर्वी लाँच झालेल्या काही ऑपरेटिंग सिस्टिमची चर्चा आणि त्यांना मिळालेला प्रतिसादही चांगला होता. येत्या शुक्रवारी लाँच होत असलेल्या विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिमचाही गाजावाजा होण्यासाठी कंपनीने प्री-लाँचसाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, कंपनीकडून पूर्वी लाँच झालेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला मिळालेला प्रतिसाद विंडोज ८ ला मिळणार का यावर तज्ज्ञांकडून शंका व्यक्त केली जात आहे.

असा अंदाज आहे की, विंडोज ८ मध्ये प्रत्येकासाठी नवे काही ना काही तरी असेल. टॅब्लेट पीसीप्रेमींसाठी टचस्क्रीन सुविधा, नवा इंटरफेस आणि डेस्कटॉपबरोबरच येत असलेल्या पारंपरिक सॉफ्टवेअरना पूरक असे हे नवे सॉफ्टवेअर असणार आहे. मात्र, असे असले तरी ही ऑपरेटिंग सिस्टिम का घ्यावी, असा प्रश्न अनेक कंपन्यांना आहे. कंपनीने काही वर्षांपूर्वी विंडोज ७ बाजारात आणले. मात्र, अजूनही अनेक यूजर हे विंडोज एक्सपीवरून विंडोज ७ ला अपग्रेड होऊ शकलेले नाहीत. विंडोज ८ चा प्लॅटफॉर्म हा बिझनेस प्लॅटफॉर्मपेक्षा कन्झ्युमर प्लॅटफॉर्म असल्याचे वाटते आहे.

त्यामुळे कंपन्यांना याकडून फारशा अपेक्षा नाहीत. परिणामी, कंपन्यांकडून विंडोज ८ ला मागणी असण्याची शक्यता कमी आहे. कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा मोठा ग्राहक हा बिझनेस कॅटेगरीतला आहे. पर्सनल कॅटेरीचे प्रमाण तुलनेत कमी आहे. भारतासारख्या ठिकाणी पर्सनल कम्प्युटरवर लायसन्स प्रॉडक्ट वापरण्याबाबत फारशी जागरूकता नाही. एखादी कंपनी किंवा प्रॉडक्टला चांगला वा वाईट प्रतिसाद या गोष्टी घडत असतात. व्यवसाय कशा पद्धती बदलत आहे याचे उदाहरण म्हणून विंडोज ८कडे पाहायला हवे. मात्र, कंपनी ग्राहक आणि वैयत्ति*क ग्राहक यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे हे संकेत आहेत, असाही कयास काही तज्ज्ञांनी बांधला आहे. टॅब्लेट पीसी आणि पीसी यांबाबत कोणतीही तडजोड करण्यास व्यावसायिक ग्राहक तयार नाहीत.

त्यामुळे विंडोज ८ ला थोडाफार प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. टच एक्सपिरिअन्समध्ये आपण मास्टर आहोत, याची चुणूक मायक्रोसॉफ्टकडून नव्या ऑपेरिंग सिस्टिमच्या माध्यमातून दाखविली जाण्याची शक्यता आहे. कंपनी करत असलेले माकर्ेटिंग हे तरुण ग्राहकांना समोर ठेवून करण्यात आले आहे.