
सेंच्युरीयन, २५ ऑक्टोबर-कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला जे जमले नाही, ते सेहवाग करून दाखवणार का? याकडेच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने चॅम्पियन्स लीग टी-२० च्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेल्या सामन्यात टायटन्स आणि दिल्ली संघाला प्रत्येकी दोन गुण देण्यात आले. वीरेंद्र सेहवागने संपूर्ण मालिकेत चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन करीत संघाला सेमीफायनलमध्ये पाहोचवण्यास चांगलीच मदत केली.