अॅपल आज लाँच करणार मिनी आय-पॅड

न्युयॉर्क,२३ ऑक्टोबर-अॅपलच्या सगळ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे अॅपल आज मिनी आय-पॅड लाँच करणार आहे. सप्टेंबरमध्ये नवीन आय-फोन ५ लाँच करताना अॅपलने त्याचवेळी मिनी आय-पॅडचीही चाहूल जगाला करुन दिली होती.

नुकतेच सॅमसंगला कॉपीराईट खटल्यात हरवून मोबाईल क्षेत्रात आपली वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत असलेल्या अॅपलने या मिनी आय-पॅडची किंमत मात्र गुप्त ठेवली आहे. खरेतर आकाराने मिनी असलेल्या या आय-पॅडचे नावही वेगळे असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

एप्रिल २०१० मध्ये आय-पॅड बाजारात आणण्यात आले होते. जबरदस्त हिट ठरलेल्या या आय-पॅडची आतापर्यंतची विक्री ही जवळपास ८.४ कोटी युनिटस एवढी झाली आहे.

आता या आय-पॅडचाच छोटा भाऊ म्हणजेच मिनी आय-पॅडला जगभरातल्या ’टेक्कीं’चा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Leave a Comment