प्रियांकानंतर शाहरुख आता परिणीतीसोबत…

शाहरूख खान-प्रियांका चोप्राच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली. लवकरच शाहरुख प्रियांकाची चुलत बहिण परिणीती चोप्राबरोबरही झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे.’हॅप्पी न्यू इअर’ हा फराह खानचा आगामी चित्रपट… या चित्रपटात शाहरुख आणि परिणीती एकत्र दिसणार असल्याचे समजते आहे. परिणीतीने ’लेडीज वर्सेस रिकी बेहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. पण, त्यानंतर आलेल्या ’इश्कजादे’मुळे तिला नवी ओळख प्राप्त झाली आहे. आणि आता तर शाहरूखसोबत काम केल्यानंतर तिच्या करिअरला चांगलीच गती प्राप्त होईल, असे दिसते आहे.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या ’इश्कजादे’ने बॉक्सऑफिसवर एकच धम्माल उडवून दिली होती. यामध्ये परिणीतीच्या अभिनयाचे तोंड भरून कौतूकही झाले. त्यानंतर परिणितीला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. फराहासुद्धा आपल्या ’हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटासाठी एका नव्या चेहर्‍याच्या शोधात होती आणि तिला हवाय तसा चेहरा परिणीतीच्या रुपाने तिच्यासमोर उभा राहिला. ही गोष्ट फराहने अजून जाहीर केली नसली तरी बॉलिवूडमध्ये कोणती गोष्ट लपून राहते? शाहरुख आणि परिणीतीच्या जोडीचा विचारही फराहाच्या डोक्यात आहे.

परिणीती अगोदर फराह विद्या बालनला चित्रपटात घेण्यासाठी इच्छुक होती पण विद्याचे वाढलेले वजन पाहून फराहला तोंडात बोट घालावे लागले. फराहच्या ’हॅप्पी न्यू इअर’मधली हिरोईन मादक आणि कमी वयाची मुलगी आहे. त्यामुळे तिने परिणीतीला फिक्स केले आहे. आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती याची, की शाहरुख हा सिनेमा स्वीकारणार की नाही?

 

Leave a Comment