राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली: काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर तरुणीचे अपहरण आणि बलात्काराचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. राहुल आणि गांधी परिवाराच्या बदनामीच्या उद्देशाने याचिका दाखल करणार्‍या याचिकाकर्त्याला न्यायालयाने १० लाखाचा दंडही ठोठावला.

राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका युवतीचे अपहरण करून तुच्यावर बलात्कार केला; असा आरोप करणारी याचिका माजी आमदार किशोर समरिते यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका फेटाळून उच्च न्यायालयाने समरिते यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले होते. समरिते यांना ५० लाख रुपयांचा दंडही ठोठाविण्यात आला.

या निकालाला समरिते यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळली आहे. राहुल यांच्यावर गुन्हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे याचिकाकर्ते सादर करू शकलेले नाहीत. याचिकाकर्त्यांनी राहुल आणि त्यांच्या परिवाराला बदनाम करण्यासाठीच हा बनाव रचल्याचे नमूद करून न्यायालयाने राहुल यांना ५ लाख; तर संबंधित युवतीच्या परिवाराला ५ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले.

Leave a Comment