नवी दिल्ली: सत्यम आयटी सोल्युशन्सचे संस्थापक रामलिंग राजू यांची तब्बल ८२२ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या इतिहासात ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

रामलिंग राजू यांनी सत्यमच्या जमाखर्च आणि हिशेबात फेरफार करून ७ हजार कोटीचा घोटाळा केल्याची कबुली जानेवारी २००९ मध्ये दिली होती. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांची चौकशी केली. राजू हे सन २०११ पासून जामिनावर बाहेर आहेत.
यापूर्वी जूनमध्ये राजू आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या ४४ मालमत्ता जप्त करण्यास आंध्र प्रदेश सरकारने सीबीआयला अनुमती दिली आहे.