वॉशिग्टन दि.१६ – अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान केले असून सोमवारी त्यांनी आपले मत बराक ओबामा यांच्या पारड्यात टाकले असल्याचे ट्वीटरवर जाहीर केले आहे. अमेरिकेत असलेल्या अर्ली व्होटिंग सुविधेचा फायदा घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाच्या अगोदरच मिशेल यांनी मतदान केले आहे.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या ट्वीटला रिट्वीट करताना मिशेल ओबामांच्या पावलावर पाऊल टाकणार असल्याचे आणि २५ आक्टोबर रोजीच मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. असे घडले तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रसिडेंट आणि फर्स्टलेडी यांनी मतदान न करण्याची ही पहिलीच घटना असेल.
अर्ली व्होट झालेल्या भागात ओबामा लिडींग असल्याची बातमी आहे. त्या भागातील मतदान निकालांना रोमनी गटाने चॅलेज दिले असल्याचेही वृत्त आहे.