इस्लामाबाद: पाकिस्तानप्रमाणेच भारतातही आपल्या भावविभोर गजल गायकीने लोकप्रिय असलेले गायक गुलाम अली यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयांचे दागिने, चीजवस्तू आणि रोकड लुटून नेली.

सोमवारी रात्री उशीरा पांढर्या कारमधून आलेल्या चार बंदूकधारी दरोडेखोरांनी गुलाम अली यांच्या लाहोरमधील डिफेन्स कॉलनी येथील निवासस्थानात प्रवेश केला. यावेळी स्वत: गुलाम अली वगळता इतर सर्व कुटुंबीय घरात उपस्थित होते. दरोडेखोरांनी अली कुटुंबियांना शस्त्राच्या धाकाने एका खोलीत कोंडून ठेवले आणि घरात लूट केली.
गुलाम अली यांचे बंधू आशिक अली यांनी सांगितले की दरोडेखोरांनी सुमारे ७ लाख रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड लुटून नेली. त्यांनी अली कुटुंबियांना तब्बल ४ तास कोंडून ठेवले होते.