हौशी संशोधकांनी शोधला ४ सूर्य असलेला ग्रह

कनेक्टीकेट: एकाच ग्रहाला अनेक चंद्र असल्याची अनेक उदाहरणे ज्ञात आकाशगंगेत आहेत. मात्र एकाच ग्रहाला अनेक सूर्य असल्याचे पहिलेच आश्चर्यकारक उदाहरण दोन हौशी संशोधकांनी शोधून काढले आहे. या ग्रहाला तब्बल चार सूर्य असून त्याचा या ग्रहावरील गुरुत्वाकर्षणावर विपरीत परिणाम कसा होत नाही; हा अभ्यासाचा भाग आहे.

अमेरिकेतील येल विद्यापीठाच्या कियान जेक आणि रॉबर्ट गेग्लीआनो या दोघा हौशी अवकाश संशोधकांनी ४ सूर्य असलेला ग्रह शोधून काढला आहे. या ग्रहाचे पीएच १ असे नामकरण करण्यात आले आहे. हा ग्रह पृथ्वीपासून ५ हजार प्रकाशवर्ष अंतरावर असून त्त्याचा आकार पृथ्वीपेक्षा सहापट मोठा असण्याची शक्यता आहे. या ग्रहावरील तापमान २५१ ते ३४० अंश सेल्सियस असण्याची शक्यता असून त्यावर जीवसृष्टी संभवत नाही.

हा ग्रह दोन सूर्यान्भोवती फिरत असून त्यासाठी त्याला १३८ दिवस लागतात; तर आश्चर्यकारक बाब म्हणजे इतर दोन सूर्य या ग्रहाची परिक्रमा २० दिवसात पूर्ण करतात. सूर्याने ग्रहाभोवती फिरण्याचे हे एकमेव उदाहरण आहे.