नवी दिल्ली: कोळसा खाण घोटाळयासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने सोमवारी पहाटेपासून देशभर छापासत्र सुरू केले असून दोन कंपन्यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे.
नवी दिल्ली: कोळसा खाण घोटाळयासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने सोमवारी पहाटेपासून देशभर छापासत्र सुरू केले असून दोन कंपन्यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे.
कोळसा खाण घोटाळ्याचा तपास करणार्या सीबीआयने सोमवारी पहाटेपासून दिल्ली, जयपूर, सतना, सिकंदराबाद, रुरकेला, विशाखापट्टण, हैदराबाद या ठिकाणी छापे घातले. ग्रीन इन्फ्रा आणि कमल स्टील या कंपन्यांच्या विरोधात सीबीआयने प्राथमिक माहिती अहवालही दाखल केले आहेत. या दोन्ही कंपन्यांनी कोळसा खाण मिळविण्यासाठी आपले भांडवल आणि साधन सामुग्री अवास्तव वाढवून दाखविल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
यापूर्वी सीबीआयने देशाच्या विविध भागात छापे घालून ५ प्राथमिक माहिती अहवाल दाखल केले आहेत.