आयफोन-५ ची किंमत ४६ हजारापासून पुढे!

मुंबई, १५ ऑक्टोबर-यूरोपीय बाजारात धूम करणार्‍या अॅपलचा स्मार्टफोन आइफोनचे नवीन व्हर्जन आइफोन-५ भारतीय बाजारात २६ ऑक्टोबर रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.
जाणकारांना आशा आहे की, इंडियन माकर्ेटमध्ये त्याचे १६ जीबीच्या मॉडलची किंमत ४६ हजार रुपये ते ४८ हजार रुपयांदरम्यान राहील. ३२ जीबी मॉडलची ५१ हजार ते ५३ हजार आणि ६४ जीबी मॉडलची किंमत ५८ हजार ते ६१ हजार रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. भारतात त्याच्या लाँचिंगआधीच युवकांत क्रेज निर्माण झाली आहे.
भारतातील लोकांनी हा एक्सट्र प्राइज देऊन खरेदी केला आहे. लाँच होण्याआधीच दिल्ली आणि मुंबईच्या बाजारात हा आयफोन ब्लॅकमध्ये विकला जात होता. लाँचिंगआधीच भारतीय बाजारात वेगवेगळ्या वेबसाइटवर जसे की ईबॉय इंडिया, रेडिफ शॉपिंग आणि ट्रेंडस डॉट कॉम आइफोन-५ ची विक्री करण्यात आली. रेडिफ शॉपिंगवर १६ जीबीचा आइफोन-५४,९९० रुपयांत विकला जात होता. तर, ट्रेंडसवर याच मॉडलची किंमत ५९,९९० रुपये होती. ट्रेंडस डॉट कामवर ३२ जीबीचा आइफोन-५ ची किंमत ७३,५९९ रुपये आणि ६४ जीबीचा मॉडलची किंमत ८६,६९९ रुपये आहे.
ई बॉय इंडियावर १६ जीबी मॉडलची ५९,९९० रुपये, ३२ जीबी मॉडल ६७,९९० आणि ६४ जीबी वर्जन ७६,९९० रुपयांत मिळत होते. असेही ऐकण्यात आले की, सर्वात छोटी कार नॅनोच्या किंमतीत १.१५ लाख रुपये देऊनही हे आयफोन खरेदी केले.