पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक ताब्यात

पुणे: बॉम्बस्फोट मालिकेतील संशयित आरोपीची माहिती घेण्यासाठी दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी औरंगाबादजवळ त्याच्या भावाला ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी तिघा संशयिताना अटक करून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

जंगली महाराज रस्त्यावर करण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एक संशयित असद खान याच्या औरंगाबाद जवळील नायगाव येथे असलेल्या घराची पोलिसांनी झडती घेऊन त्याचा भाऊ हुसेन खान याला ताब्यात घेतले आहे. काही महत्वाची कागदपत्रे आणि सेलफोन्सही हस्तगत करण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बॉम्बस्फोट आणि वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणातील सूत्रधार फय्याझ कागझी हा मराठवाड्यातील २५ हून अधिक तरुणांच्या संपर्कात आहे. मराठवाड्यात दहशतवाद्यांचे मोठे जाळे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने मराठवाड्यातील दहशतवाद्यांच्या ‘स्लीपर सेल’चे नेटवर्क शोधण्याच्या दृष्टीने पोलिसाचा प्रयत्न आहे.

Leave a Comment