जालना: शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र असावी अशी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा असल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितले.
शिवसेना, मनसे एकत्र असावी ही शिवसेनाप्रमुखांची इच्छा: कदम
सन २०१४ मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव होऊन विधानसभेवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी (ए) यांच्या महायुतीचा भगवा फडकेल आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असतील असा दावा करताना कदम म्हणाले की; शिवसेना आणि मनसे एकत्र असावी ही अनेक शिवसैनिक आणि सर्वसामान्य मराठी माणसांची इच्छा आहे. स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही शिवसेना आणि मनसे एकत्र असावी; अशीच इच्छा आहे; असेही कदम यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, दर्डा बंधू हे घोटाळ्यात अडकल्याची टीका करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य आणि केंद्रातील कारभारावर कदम यांनी तोफ डागली.