वॉशिंग्टन: पृथ्वीवरील खडकांच्या रासायनिक रचनेशी साधर्म्य असणारे खडक मंगळावर अस्तित्वात असल्याची महत्वपूर्ण माहिती क्युरिऑसिटी या यानाने नासाकडे पाठविली आहे.
वॉशिंग्टन: पृथ्वीवरील खडकांच्या रासायनिक रचनेशी साधर्म्य असणारे खडक मंगळावर अस्तित्वात असल्याची महत्वपूर्ण माहिती क्युरिऑसिटी या यानाने नासाकडे पाठविली आहे.
मंगळाच्या भूपृष्ठाचा अभ्यास करण्यासाठी नासाने क्युरिऑसिटी रोव्हर हे यान मंगळावर रवाना केले आहे. या यानाने फुटबॉलसारखा आकार असलेल्या काही खडकांची छायाचित्र पाठविली आहेत. यापैकी काही खडकांच्या रासायनिक संरचनेत आणि पृथ्वीवरील खडकांच्या संरचनेत मोठ्या प्रमाणात साधर्म्य असल्याचे नासाच्या संशोधकांना जाणविले. हे दोन्ही खडक एकाच प्रक्रियेतून अस्तित्वात आल्याचा दावा आत्ताच करणे घाईचे होणार असले तरीही हा अभ्यास अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे; असे संशोधकांनी सांगितले.