सचिनने सुचवला नंबर वन फॉम्युला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदार झाल्यानंतर आता देशाची खेळाची सध्यस्थिती बदलण्यासाठी पुढे सरसावला आहे. त्यासाठी सरकारला त्याने काही सूचना केल्या आहेत. खासदार झाल्यानंतर सचिनने पहिल्यांदाच एक रोडमॅप तयार केला आहे. सचिनने भारताला सर्व प्रकारच्या खेळात नंबर वन बनविणारा हा फॉम्युला गेल्या महिन्याताच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल व केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांच्याकडे सादर केला आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोन फायली सोबतच सचिनने २५ स्लाईडचे प्रेजेंटेशन तयार केले आहे. त्याने सादर केलेल्या या अवहालात आगामी काळात भारतातील खेळाची परिस्थिती कशी सुधारता येईल यावर उपाय सुचविले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जमिनीवरील खेळ प्रकारात खेळाडूची प्रतिभा कशी तयार करता येईल. युनिव्हर्सिटी व कॉलेजलेवलवर खेळांना कसे कॉम्पिटीटीव करता येईल, त्यासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर कसे तयार करता येईल. त्याशिवाय प्रत्येकाला फिजिकल अक्टीविटी कम्पलसरी करण्याच्या सुचना त्यांनी या अहवालात केल्या आहेत.

देशाला सर्वच क्रीडा प्रकारात नंबर वन बनविनरा हा फॉम्युला सचिनने नुकताच सादर केला आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेणार व हा नंबर वन फॉम्युला कधीपासून अंमलात आणला जाणार आहे. याला मात्र सरकारीस्तरावर अधीकृत दुजोरा मिळू शकला नाही. त्यामुळे सचिनने सुचविलेला हा नंबर वन फॉम्युला अजून तरी गुलदस्त्याच आहे.

Leave a Comment