
कोलकाता,१० ऑक्टोबर-चाळीस वर्षापूर्वी अमेरिकेतील संगणक तज्ज्ञ रे टॉमलिनसॉन याने पहिल्यांदा ईमेल पाठवला होता. त्यामुळे संदेशवहनात जागतिक पातळीवर क्रांती घडून आली. पण भारतात ईमेलचे जाळे पसरण्यात आणखीन २० वर्षे लागली.
टॉमलिनसॉनने ऑक्टोबर १९७१ मध्ये एक सॉफ्टवेअर तयार केले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांनी एका संगणकावरुन दुसर्या संगणकावर संदेश पाठवला. त्याने हे सॉफ्टवेअर इंटरनेटचे अस्तित्व माहित नसताना तयार केले होते, अशी माहिती टाटा इंस्टिट्यूटमधील संगणक विज्ञान शाखेच्या माजी शिक्षिका सुगता संन्याल यांनी दिली.
१९६० मध्ये टॉमलिनसॉनच्या या शोधाला आणखीन आधुनिक रुप प्राप्त झाले. त्याने तयार केलेल्या इमेलच्या फॉरमॅटमध्ये ’कंम्पोज’, ’अॅड*ेस’, ’सेंन्ट’ या नव्या ऑप्शन्सचा समावेश करण्यात आला.
पहिल्यांदा इमेल पाठवण्याठी दोन संगणकांमधील भौतिक जोडणी करण्यात आली होती. पण त्यानंतर ’अरपानेट’चा (अठझअछएढ) शोध लागल्यानंतर दोन संगणक इंटरनेटशी जोडले गेले अन् माहितीच्या विश्वात अद्भभूत क्रांती घडली. हा शोध लावण्यात भारतीय शास्त्रज्ञांचा वाटा खूप मोठा आहे.