साईनाच्या नावाने रोबोची विशेष एडिशन

हैद्राबाद दि.९ – जमीन स्वच्छ करणे, खिडक्या स्वच्छ करणे यासारख्या घरगुती कामांसाठी रोबो आणि टॅब्लेट पीसी तयार करणार्‍या हैद्राबादच्या मिल ग्रो ह्युमन टेक कंपनीने ऑलिंपिक स्पर्धात बॅडमिंटनचे पदक मिळविणार्‍या पहिल्या महिला खेळाडू साठी म्हणजे साईना नेहवालसाठी रेड हॉक रोबोची विशेष एडिशन तयार केली आहे. 

या विशेष एडिशन रोबोच्या विक्रीतून येणार्‍या रकमेपैकी ५ टक्के रक्कम साईनाला देण्यात येणार आहे. तर १ टक्का रक्कम साईनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिटन अॅकॅडमीसाठी देण्यात येणार आहे असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव करवल यांनी सांगितले. ही कंपनी पाच वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.

 

Leave a Comment