अक्षयकुमार दाखविणार ट्विंकलला सिनेमा

काही दिवसापुर्विच ट्विंकलने मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या ती घरीच आराम घेत आहे. अक्षयकुमारने निर्मिती केलेला ‘ओह माय गॉड’ हा सिनेमा आतापर्यंत ट्विंकलने बघितला नाही. त्यामुळे अक्षयकुमार पत्नी ट्विंकलला हा सिनेमा घरबसल्या कसा पाहता येईल याच्या विवचनेत सध्या तो आहे.

गेल्या काही दिवसापासून अक्षयकुमार हा सिनेमा ट्विंकलने पाहावा यासाठी प्रयत्न करीत आहे. अक्षयचा हा सिनेमा ट्विंकलला आवडेल असाच आहे. ‘ओह माय गॉड’ हा सिनेमा गेल्या काही दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तर चांगली कमाई करत आहे. त्यामुळे अक्षय सध्या जाम खूष झाला आहे. त्यापेक्षा अक्षयला या सिनेमामुळे प्रेक्षकांचे विचार बदलत असल्याचे निदर्शनास आले असल्यानेही सध्या तो खूष आहे.

या सिनेमातून धर्माचा व्यापार करणाऱ्याना धडा शिकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सुरुवातीला प्रेक्षक अशा स्वरूपाचा वेगळ्या धाटनीचा सिनेमा स्वीकारतील का याचा दबाव त्याच्यावर आला होता. यामध्ये परेश रावलची मुख्य भूमिका आहे. तर अक्षयने छोटासा रोल केला आहे. त्याशिवाय दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने सादर केलेले आयटम सॉंग भलतेच भाव खावून गेले आहे.

Leave a Comment