आता दोन रुपयांत ’डायबेटीस’ चाचणी!

नवी दिल्ली,९ ऑक्टोबर-रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी (डायबेटीस) आता आणखी सोपी होणार असून, अवघ्या एका मिनिटात आणि केवळ दोन रुपयांत आपल्याला रक्तातील साखरेचे प्रमाण कळू शकणार आहे.

भारतात मधुमेह असलेल्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. सध्या भारतात सुमारे ६.१ कोटी नागरिक मधुमेही आहेत. त्यातील अनेकांना सतत रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे लागते. यावर भारतीय शास्त्रज्ञांनी उपाय शोधून काढला असून, आता कमी वेळात साखरेचे प्रमाण तपासता येणार आहे.

बिटस पिलानी संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे उपकरण शोधून काढले असून, भारतीय वैद्यकीय तपासणी संस्थेकडून (आयसीएमआर) त्याला मान्यता मिळणे बाकी आहे.
आयसीएमआरचे संचालक आणि शास्त्रज्ञांनी या उपकरणामुळे साखरेचे रत्त*ातील प्रमाण सहज कळू शकेल, असे म्हटले आहे. येत्या डिसेंबरमध्ये हे उपकरण बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ते देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये वापरण्यात येणार असून, त्याची चाचणी झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे उपकरण विकत घेण्यासाठी अगदी कमी रक्कम द्यावी लागणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही