सोन्याने सजवा रेशमी केस

hair

फॅशनच्या युगात भूतकाळातल्या गोष्टी आल्या तर त्यात काही नवल नाही. कारण राजा-महाराजांच्या काळात मोठ्या कलाकुसरतेने तयार करण्यात आलेले पेहराव, नक्षीदार दागिने आजच्या आधुनिक युगातील कारागिरांना आकर्षित करत असून, त्यात काही बदल करून एक वेगळी नक्षी तयार केली जाते व तीच बाजारात पुन्हा फॅशनच्या रूपाने येते. त्यापेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे राजा-महाराजांच्या काळात सोन्याच्या मुलाम्याने केस सजविले जात होते. त्याच नक्षीकडे आजचे कारागिर आकर्षित झालेले दिसतात. फॅशन म्हणजे जुन्या नव्याचे मिश्रणच म्हणता येईल. काळानुसार फॅशनमध्ये बदल झाले आहेत. मात्र त्याच्यामागे भूतकाळ लपला आहे. नव्याने बाजारात असलेल्या हेअर ज्वेलरीवर त्याचा प्रभाव दिसतो. 

देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, उमराव जान असे काही चित्रपट आहेत, की त्यात नायिकेच्या केसांवर अधिक भर दिलेला दिसतो. भारतीय मुघल साम्राज्यातील शैली त्यात वापरलेली दिसते. या दागिन्यांना सामान्य नागरिकांनी देखील पसंती दर्शविली आहे. घागरा, साडी, सलवार-कुर्ता किंवा शर्ट पॅन्टवर देखील हे दागिने परिधान केले जाऊ शकतात. या दागिन्यांमध्ये हिरे, मोती, माणिक यांचे वर्क केले जात असल्याने त्यांच्या वजनानुसार त्यांची किंमत ठरविली जाते. रेश्मी केसांकरिता तयार करण्यात येणारे दागिने शुद्ध सोन्यात केले जातात. मात्र कमी बजेटमध्ये चांदीच्या दागिन्यांवर सोन्याची पॉलिश करून ते खरेदी करता येऊ शकतात.

 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment