चालकाच्या चेहरा पाहून कृती करणारी नवी कार

टोयोटो या जपानी कार उत्पादक कंपनीने चालकाच्या चेहर्‍यावरून त्याला पुढे काय करायचे आहे याचा अंदाज बांधणारी आणि त्याप्रमाणे कार्य करणारी स्मार्ट कन्सेप्ट कार तयार केली असून टोकियो येथे सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रदर्शनात ती सादर करण्यात आली आहे.

या कारचे वैशिष्ठ्य म्हणजे तिच्यात मोशन सेन्सर्स बसविण्यात आले असून व्हॉईस रेक्गनिझेशन यंत्रणाही देण्यात आली आहे. तसेच स्मार्टफोन सॅटेलाईट नेव्हीगेशन सिस्टीमही बसविण्यात आली आहे. यामुळे चालकाची वर्तणूक पाहून अथवा त्याचा चेहरा पाहून त्याला पुढे कोणती कृती करायची आहे याचा अंदाज ही कार बांधू शकते. चालक कारजवळ आला की त्याचा आवाज ऐकताच दरवाजा उघडते, स्क्रीनवर हॅलों अक्षरे टाईप करते, लाईट फ्लॅश करते. कारमधली ही सारी सिस्टीम टोयोटोच्या क्लाऊड मध्ये कनेक्ट करण्यात आली असून व्हर्चुअल एजंटच्या सहाय्याने ती लिंक्ड केली गेली आहेत. त्यामुळे सेटींग आपोआप बदलली जातात.

चालक घरात असेल तरी तो घरातूनच बाहेर पडण्यापूर्वी कार लॉक उघडणे, वातानुकुलित यंत्रणा सुरू करणे ही कार्ये रिसेट करू शकतो. त्यामुळे चालकाचे निम्मे काम ही कारच पार पाडणार आहे.

 

Leave a Comment