चित्रकारांची हुबेहुब कॉपी करणारा रोबो

टोकियो दि.३ – चित्रकार चित्रे रेखाटत असेल किवा एखादा कॅलीग्राफर (सुलेखनकार) आपल्या कलेचे प्रात्यक्षिक दाखवित असेल तर त्याच्या कलेची हुबेहुब कॉपी करणारा रोबो संशोधकांनी तयार केला असून मंगळवारी त्याचे प्रात्यक्षिक टोकियो येथे भरलेल्या आशियातील सर्वात मोठ्या तंत्र प्रदर्शनात सादर करण्यात आले आहे. कंबाईंड एक्झिबिशन ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी या नावाने भरविण्यात येणारे हे प्रदर्शन मंगळवारीच सुरू झाले आहे.

कियो विद्यापीठातील संशोधकांनी या रोबो तयार केला असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा रोबो पिकासो किंवा व्हॅन गॉग अशा प्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृती कॉपी करू शकणार नाही. कारण त्याच्यासमोर ज्याची कॉपी करायची ते मॉडेल जिवंत अवस्थेतच असायला हवे. त्यामुळे जो कलाकार त्याच्यासमोर त्याची कलाकृती सादर करेल त्याचीच कॉपी रोबो करू शकेल. असा रोबो बनविण्यामागचा उद्देश मात्र वेगळा आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया किवा अति किचकट यंत्र जुळवणीच्या कामात हे रोबो उत्तम सहाय्यक ठरू शकणार आहेत. मोशन कॉपी सिस्टीम असणारा जगातला हा पहिलाच रोबो आहे.

 

Leave a Comment