ऑस्ट्रेलियाने पाकसोबतचा सामना मुद्दाम हरला

ऑस्ट्रेलियाने क्रिकेट जगतात जेवढे नाव कमवले आहे. त्यापेक्षा किती तरी घाणेरडे प्रकार करून त्यांनी नाव बदनाम करून घेतले आहे. त्यांच्या या अशास्वरूपाच्या हरकतीमुळेच ते क्रिकेट जगतात बदनाम झाले आहेत. मंगळवारी टी-२० च्या विश्वचषकाच्या ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने पाककडून सामना हरला त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात नाराजी पसरली आहे. ज्यांनी ज्यांनी हा सामना पाहयला असेल त्यांना सामना फीक्स कसा केला जातो याचा अंदाज आला असेल.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंग करताना पाकच्या लवकर विकेट जाऊनही त्यांना १४९ धावा करण्याची सुट दिली. तर हे आव्हान मैदानात घेऊन उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या निर्धाराने खेळलाच नाही. धडाकेबाज सुरुवात करणारे शेन वॉटसन व डेविड वॉनर यांनी कसोटी सामन्याप्रमाणे सुरुवात केली.

पाकला सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी चांगल्या धावगतीने विजय आवशयक होता. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी २० षटकात ११२ धावा करायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी संथगतीने सुरुवात केली. पहिल्या आठ षटकात २ बाद ३४ धावा झाल्या होत्या. त्यामुळे विजयाच्या निर्धाराने ऑस्ट्रेलिया संघ खेळलाच नाही तर १६ षटकात पाच गडी बाद ९० धावा झाल्या होत्या. त्यामुळे दोन्ही संघ सामना फिक्स करून खेळात असल्याचे उघड झाले आहे. केवळ भारतीय संघाला सेमीफायनल पासून दूर ठेण्यासाठी ही खेळी केली जात असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आहे. १८ व्या षटकात ऑस्ट्रेलियाने ११२ धावा केल्यानंतर त्यांनी सामना जिंकल्याच्या तोऱ्यात बॅट वर केली होती. त्यामुळे हा सामना फिक्स झाला असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.

Leave a Comment